माझ्या खऱ्या आयुष्याची सुर्वात ही नाहीच मुळी पण आयुष्यात जास्त काळ चालणारे पर्व हे होते म्हणू याची सुरवात मी माझ्या टपरी म्हणजेच पान टपरी चड्डी आपरी या लेखा पासून करतो.
मी तसा सगळ्या सारखाच एक निरागस मुलगा पण माझ्या आयुष्याची खरी सूर्वात पान टपरी पासून झाली.
मी पहिल्या दिवशी शाळेत ना बसलेलो मुलगा पण नंतर मला शाळा म्हणजे माझा श्वास किव्वा माझे विश्र्वच होते पण काळाच्या नियमा प्रमाणे मला टपरी वर बसणे अनिवार्य होते. मी शाळा सुटली की शाळेच्या कपड्या मध्येच म्हणजे विथ युनिफॉर्म टपरी वर बसायचो.वडिलांना जेवणा साठी व आराम करण्या साठी सोडायायचो मुळी मला यात वाइट वाटण्या सारखे काही नव्हते पण माझी सर्व लक्ष्य हे ८ वाजण्या कडे असायचे जसा जसा टाईम जवळ यायचा तसे तसे मला एक एक मिनिट तासा सारखा वाटायचं करणकी माझे बालपण मला घरी बोलवायचे याचा खूप राग यायचा पण मन नाजूक आणि कुणाला सांगू ही शकत नाही.ऐकणार कुणी नव्हताच मुळी....८ चा टाईम नंतर ९ झाला नंतर घर बदलले तर शाळा सुटली तर आवरून दुकानावर अभ्यासाची पुस्तके घेवून यायची व टाईम ९ चा ९:30-10झाला होता.मी तेच परत मला कधी सोडणार याची वाट पाहत असायचो. नंतर सुट्टी चे दिवस व शनिवार रविवार फिक्स टपरी वर बसायचे हे फिक्स कधी झाले मला ही समजले नाही व आठवत ही नाही.नाही बसलो कधी तर बोलणे व मार फिक्स हे मात्र मला नक्कीच आठवते.दुकानावर आल्यावर दिवस भरची भूक असायची मग मी लोकमत चे सफर जगाची पुरवणी, व खेळ विश्व हे पान नक्की वाचायचो त्यातील आवडते लेख परत वाचयतो व कात्रण काढून ठेवायचो अर्थात चहा आणि परले जी खाता_खाता. आयुष्यात हेच तर होते त्याची मला साथ होती.
या सर्व गोष्टी जेवढ्या सोप्या वाचायला वाटतंय तेवढ्या सोप्या नव्हत्या माझ्या साठी.मला पण इतर मुलांन प्रमाणे खेळू वाटायचे उन्नाड मस्ती करू वाटायची तसे वर्गातील येखांद्दी शिक्षिका,मुलगी वा शिक्षक दिसले तर मी हळूच टपरीच्या खालच्या भागात लपायचो व त्या वेळेस गिरहिक येवू नये अशी प्रार्थना करायचो असे होयचेच नेहमी असे नाही पण आयुष्य असेच चालले होते...त्यात अनेक पैलू यायचे बाकी होते अनुभव पण....... बालपणातील दुसऱ्या बाजूस ही संघर्ष होताच तो पण मी माझ्या पुढील लेखा मध्ये व्यक्त करेन तो या टपरी आणि चड्डी अपरीला समांतर कालबद्ध असेल.
No comments:
Post a Comment