सुचतील सारे नखरे
दिसतील सारे गोजिरवाणे
दिसतील सारे हसरे
या पोटामध्ये कण असतील तर...
या मनामध्ये मान असेल तर
विनम्र मान झुखवशिल
आदर देशील सर्वांना आणि
स्वतः ही मान मिळवशिल
या मनामध्ये मान असेल तर
या डोळ्यामध्ये स्वप्न असेल तर
सत्यात ही काही येतील
काही राहतील अपूर्ण तर
काही तर पूर्ण होतील
या डोळ्यामध्ये स्वप्न असेल तर
या पोटामध्ये कण असतील तर
सुचतील सारे नखरे
दिसतील सारे गोजिरवाणे
दिसतील सारे हसरे.............
# स.वा.वाघमारे